राजगिरा लागवड #Agrownet™
rajgira.lagwad
- No items.
Screenshots
Description
राजगिरा हे द्विदत वर्गय व जलद गतीने वाढणारे पीक असून या पिकाची महाराष्ट्रामध्ये थोड्या प्रमाणांत सर्वत्र लावाड आढळते. मानवी शरीरातील रक्त वाढविणा-या या पिकाचे मूळस्थान पूर्व व पश्चिम आशिया व आफ्रिका आहे. तथापि अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात, सोतापूर जिल्ह्यातील बार्शी तालुव्यांत व बीड जिल्ह्यामध्ये याची पुष्कळ लागवड करतात. माठ, तांदूळचा व राजगिरा या वनस्पती एकाच वर्गात मोडतात. राजगिरा या पिकाच्या धान्याचा रंग वेगवेगळ्या जतीनुसार काळा, सोनेरी, पिवळा किंवा पिवळसर पांढरा असतो. हे पीक हरभरा आणि गव्हामध्ये मिश्रपीक म्हणून घेतले जाते. रब्बी हंगामात सलग पीक म्हणून लागवड केल्यास अधिक उत्पादन मळू शकते. हे पीक सी-4 वर्गातील असून, या पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमतासुद्धा चांगली आहे.
सुधारित जाती
ऍमरान्थस हायपोकॉनाड्रेक्स, ऍमरान्थस काउडॅट्स व ऍमरान्यस कुरेन्टस या तीन प्रजातींची लागवड प्रामुख्याने करण्यात येते.
फुले कार्तिकी:
ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून विकसित केलेली असून 110 ते 120 दिवसांमध्ये हो जात काढणीसाठी तयार होते. ही जात 5 ते 7 फूट वाढते, पाने हरव्या रंगाची असतात. कणीस लांबट व पिवळ्या रंगाचे असून, लांबी 40 ते 60 सेंमीपर्यंत आहे. पीक पक झाल्यानंतर कणसांची कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास दाणे झडतात व उत्पादनात घट होते. सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास प्रति एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पदन मिळते. पासोबतच सुवर्गा, अन्नपूर्णा, जी.ए.-1, इत्यादी सुधारित जातीही लगवडीसाठी उपलब्ध आहेत.
जमीन व हवामान
नध्यम ते भारी काळी कसदार, उत्तम निचरा होणारी जमिन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. सामू साधारणपणे 5.5 ते 7.5 असावा. अगर्दीच हलकी, पाणथळ, चोपण व क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये. जमिनीमध्ये लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून ढेकळे फोडून भुसभुशीत करून एकरी 2 ते 3 टन कुजलेले शेणखत मिसळावे. या पिकाच्या वाढीसाठी थंड व कोरडे हवामान उत्तम राहते. सरासरी 10 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असल्यास या पिकाची चांगली वाढ होते.
पेरणी
पेरणी साधारणपणे ऑक्टेबर महिन्याच्या दुसऱ्या ते नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. पेरणीस उशीर झाल्यास सुरवातीच्या काळात कर्म तापमानामुळे पीक वाढीवर परिणाम होतो. एकरी 600-900 ग्राम बियाणे लागते. बियाणे बारीक असल्याने लागवड करताना बियाप्यामध्ये बारीक वाळू, वाळलेली मात, रवा मिसळावी. लागवड करताना दोन झाडांमधीत अंतर 15 सेंमी व दोन ओळीमधील अंतर 45 सेंमी ठेवावे. बियाचा आकार लहान असल्यामुळे लागवड करताना बियाणे 1 ते 2 सेंमी पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण योग्य वेळेत व चांगली हेऊन प्रति एकरी आवश्यक रोपांची संख्या निळते.
पाणी व अन्नद्यव्ये व्यवस्थापन
पेरणीनंतर सारे पाडून लगेच हलके पाणी द्यावे. पिकाचा जोमदार वाढीचा काळ (पेरणीनंतर 25-40 दिवस), फुलोऱ्यात येण्याचा काळ (पेरणीनंतर 50-60 दिवस) व दाणे भरण्याचा काळ (पेरणीनंतर 80-100 दिवस) या अवस्थेत आवश्यकतेप्रमाणे व जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे. हे पीक खतास उत्तम प्रतिसाद देते. माती परीक्षणानुसार एकरी 25 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 10 किलो पालाश लागते. नत्राची आर्धी व स्फुरद, पालाशची संपूर्ण मात्रा पेरणी वेळी व उरलेली नत्राची आर्धी मात्रा पेरणीनंतर 20 दिवसांनंतर द्यावी. योग्य वेळी देण्यात आलेल्या खतांमुळे पिकाची जलद वाढ होऊन पानांच्या आकार वाढीसाठी फायदा होतो.
आंतरमशागत
पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी लहान रोपांची विरळणी करावी. विरळणी केलेल्या रोपांची पालेभाजी म्हणून विक्री करावी. विरळणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांच्या आत आंतरमशागत करावी. एक ते दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी व भुसभुशीत करावी. कोळपणी नंतर झाडाच्या बुंध्याजवळील मातीच्या भरीमुळे पीक पक्व झाल्यावर पडत नाही.
काढणी व उत्पादन
पेरणी नंतर 110 ते 120 दिवसांमध्ये हे पिक काढणीस येते. सुधारित तंत्राचा वापर केल्यास एकरी 4 ते 10 क्विटल उप्तादन मिळते. उत्पादनामध्ये जातीनिहाय फरक पडत असल्याने अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवडीसाठी निवड करावी.
पौष्ठिक तत्त्व
• राजगिरा पिकामध्ये 14 ते 16 टक्के प्रथिने, लायसिन हे अत्यावश्यक अमिनो ऍसिड व लिनोलिक अॅसिड हे फॅटी अॅसिड उपलब्ध असते. बीटा कॅरोटिन, कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांचे प्रमाणसुद्धा चांगले आहे.
• राजगिऱ्याचा आहारात वापर केल्यास 'अ' जीवनसत्त्वाची कमतरता भरून येण्यास मदत होते, तसेच फोलिक एसिडचेसुद्धा प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.